The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत स्किलिंग इन्स्टिट्यूटमार्फत रोजगारोन्मुख प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींना प्रमाणपत्र वितरण समारंभ नुकताच एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय येथे उत्साहात पार पडला. यावेळी 1050 प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची दिशा देण्याच्या उद्देशाने पोलीस दादालोरा खिडकी आणि स्किलिंग इन्स्टिट्यूटची संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, चारचाकी वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक अशा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. सन 2024-25 मध्ये 35 प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 1050 युवक-युवतींनी सहभाग घेतला. आतापर्यंत एकूण 1380 प्रशिक्षणार्थी लाभार्थी ठरले आहेत.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, “यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. मेहनत, चिकाटी आणि ध्येय निश्चिती हीच यशाची गुरुकिल्ली आहे. येत्या काळात AI (Artificial Intelligence) सारख्या कौशल्यांचाही समावेश प्रशिक्षणात करण्यात येणार आहे.”
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखा व पो.उ.नि. चंद्रकांत शेळके यांचे मोलाचे योगदान लाभले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #प्रोजेक्टउडान #SkillDevelopment #YouthEmpowerment #PoliceInitiative #गडचिरोली #प्रोजेक्टउडान #पोलिसउपक्रम #युवकसक्षमीकरण #कौशल्यविकास #रोजगार #पोलिसदादालोराखिडकी #गडचिरोलीपोलिस #Gadchiroli #ProjectUdaan #PoliceInitiative #YouthEmpowerment #SkillDevelopment #EmploymentOpportunities #SmartPolice #TrainingForFuture