गडचिरोली : पीडीकेव्ही उत्पादने विक्रि केंद्राची सुरवात

144

The गडविश्व
गडचिरोली, २७ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२३ रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. तसेच डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचे संपल्पनेनुसार तसेच डॉ. डी. बी. उंदीरवाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन २६ जानेवारी २०२३ रोजी कृषि महाविद्यालय, गडचिरोली, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली आणि कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय, आय. टी. आय. चौक जवळ, गडचिरोली येथे पिडीकेव्ही विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
सदर उद्घाटन कार्यक्रमाकरीता डॉ. माया राऊत, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, गडचिरोली डॉ. संदिप एस. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली, डॉ. वाय. आर. खोब्रागडे, सहयोगी प्राध्यापक, कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली तसेच कृषि महाविद्यालय, गडचिरोली, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली आणि कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
सदर पिडीकेव्ही विक्री केंद्रामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रसारीत बि-बियाणे, जैविक खते, जैविक किडनाशके, बुरशीनाशके, गांडुळ खत, कृषि औजारे, मुल्यवर्धित पदार्थ तसेच इतर उत्पादीत कृषि निविष्ठांची विक्री करण्यात येणार आहे. सदर पिडीकेव्ही विक्री केंद्राव्दारे शेतकऱ्यांना विद्यापीठ दरानुसार कृषि निविष्ठांची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
डॉ. माया राऊत, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, गडचिरोली ह्यांनी रासायनिक खताचा वापर न करता जैविक खताकडे वळावे जेणेकरून शेतीतील लागवड खर्च कमी होऊन निव्वळ नफा अधिक होईल असे प्रतिपादन केले.
डॉ. संदिप एस. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली ह्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विद्यापीठ प्रसारीत बि-बियाणे, जैविक खते व जैविक किडनाशकांचा शेती करण्यासाठी वापर करावा असे आवाहन केले.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (UPSSSC PET Result) (Tata Motors Share Price) (Adani Port share price) (Pariksha Pe Charcha 2023) (Masaba Gupta) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here