गडचिरोली : आमदाराच्या शुभेच्छा होर्डिंग ला महावितरणचा आधार

1761

– विद्युत खांबावर लावले बॅनर होर्डिंग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : हल्ली होर्डिंग च्या माध्यमातून शुभेच्छा देणे, स्वतःची प्रसिद्धी करणे अगदी सोपे झाले आहेत. अशातच शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग दिसून येतात मात्र चक्क आमदाराच्या शुभेच्छा होर्डिंगला महावितरणचा आधार मिळत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे आता विद्युत खांबावर बॅनर लावणे हे वैध की अवैध आहे आणि त्यावर काय कारवाई होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे.गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील महावितरणच्या एका विद्युत खांबावर आमदाराचा शुभेच्छा होर्डिंग अनेक दिवसांपासून लावण्यात येतांना दिसून येत आहे. त्यामुळे या असल्याप्रकारे बॅनर होर्डिंग लावणे वैध आहे काय ? असा सवाल उपस्थित होत असून चक्क आमदाराच्या बॅनर वर महावितरण कारवाई करणार काय ? महावितरणची बॅनर होर्डिंग खांबावर लावण्यास मुकसंमती तर नाही ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. चक्क आमदाराचा बॅनर होर्डिंगच त्याठिकाणी अनेक दिवसांपासून विविध सण उत्सव, आंदोलने व इतर प्रकारांचे बॅनर हिर्डिंग लावण्यात येत असल्याने जणू आमदाराने बॅनर होर्डिंग लावण्याबाबत कंत्राटच घेतले की काय ? महाविततरणने आमदाराला विद्युत खांब आंदण तर दिले नाही, सामान्यांना वेगळे नियम आणि लोकप्रतिनिधी, आमदारांना दुसरे नियम आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून पुन्हा एकदा या होर्डिंग बॅनर ने आमदार चर्चेत आले आहे.

महावितरण म्हणते विद्युत खांबावर बॅनर लावण्यास मनाई

शहरात बॅनर होर्डिंग विद्युत खांबावर लावण्यात येत असल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी विचारपूस केली असता विद्युत खांबावर बॅनर लावण्यास मनाई आहे. जर का बॅनर लावले तर त्यावर पोलिसात तक्रार देऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.

अद्याप एकही कारवाई नाही

विद्युत खांबावर लावण्यात येणाऱ्या बॅनर होर्डिंग वर कारवाईबाबत महावितरण अधिकारी यांना विचारणा करण्यात आली असता अद्याप बॅनर होर्डिंग विद्युत खांबावर लावले दिसून आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र शहरात काही महिन्यांपासून मुख्य मार्गावरील विद्युत खांबावर चक्क आमदाराचा बॅनर होर्डिंग तसेच इतरही बॅनर होर्डिंग लावले जात असल्याचे दिसून येत असतांना महावितरण ला ते दिसत नसेल तर ते नवलच मानावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here