आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार क्षेत्रातील जनतेचा विश्वासामुळे : आमदार गजबे

187

– कुरखेडा येथे शहर विचार मंचाचा वतीने नागरी सत्कार
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने), दि.०९ : सरपंच परिषदेचा वतीने आपला आदर्श लोकप्रतिनिधि पूरस्काराने गौरव झाला मात्र हा गौरव खऱ्या अर्थाने आपल्यावर विश्वास ठेवत प्रतिनिधित्वाची संधी देणाऱ्या विधानसभा क्षेत्रातील जनतेचा आहे त्यांच्या विश्वासामूळेच आपण या पूरस्काराला पात्र ठरलो असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचा नूकताच सरपंच परिषद मुंबईच्या वतीने यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधि पूरस्काराने गौरव करण्यात आला. त्यांच्या या कामगीरीची दखल घेत बूधवारी1 सांयकाळी शहर विचार मंच कुरखेडा द्वारे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था सभागृह येथे त्यांचा शाल, श्रीफळ, पूष्पगूच्छ व स्मृती चिन्ह प्रदान करीत नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार गजबे बोलत होते.
कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून शहर विचार मंचाचे उपाध्यक्ष आशाताई तूलावी, सचिव उल्हास महाजन, कोषाध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे, प्रवक्ता अॅड उमेश वालदे, सदस्य जिवन पाटील नाट, चांगदेव फाये, राम लांजेवार,गणपतराव सोनकूसरे, मोहन मनूजा, डॉ जगदीश बोरकर, प्रा. किशोर खोपे, प्रा. दशरथ आदे, रामभाऊ वैद्य, मधूकर बोबाटे, आसिफ शेख, जावेद शेख, पूष्पराज रहांगडाले, सिराज पठान, प्रा. विनोद नागपूरकर, योगीता मडावी, माहेश्वरी गिरडकर, सागर निरंकारी, रोहित ढवळे आदि उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी बजावणारे रविन्द्र गोटेफोडे, चांगदेव फाये, योगीता मडावी व दूर्गाताई गोटेफोडे यांचा सूद्धा मंचाचा वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.विनोद नागपूरकर, प्रस्ताविक प्रा. दशरथ आदे तर आभार डॉ. जगदीश बोरकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here