गडचिरोली : मोठा घातपात टळला, जंगलातून माओवाद्यांचा स्फोटक साठा जप्त

108

गडचिरोली : मोठा घातपात टळला, जंगलातून माओवाद्यांचा स्फोटक साठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील लेकुरबोडी जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले जुने स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहिमेदरम्यान जप्त केले. या कारवाईमुळे संभाव्य मोठा घातपात टळला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. तीन अभियान पथके व बिडीडीएस पथक जंगलात रवाना झाले. १६ सप्टेंबर रोजी संशयास्पद ठिकाणाची तपासणी केली असता माओवाद्यांकडून लपवून ठेवलेला मोठा स्फोटक साठा पोलिसांच्या हाती लागला.
जप्त साहित्यामध्ये ५ लिटरचा स्टील डब्बा, १.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धार लावलेले लोखंडी सिलंटर, चार नग क्लेमोर व आठ नग इलेक्ट्रिक वायर बंडलचा समावेश आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोकुल राज जी., सत्य साई कार्तिक व उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोउपनि. प्रसाद पवार, निखिल धोबे, गणेश वलमर-पाटील यांच्यासह विशेष अभियान पथक व बिडीडीएस जवानांचा सहभाग होता.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सहभागी अधिकारी व जवानांचे कौतुक केले. तसेच माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले.
#thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #latestnews #kurkhedanews #korchinews #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here