– आणखी आरोपी असल्याचा अंदाज
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १८ जानेवारी : वडसा वनविभागा अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्र रामगड, वनपरिक्षेत्र पुराडा अंतर्गत येत असलेल्या राखीव वन कक्ष क्रमांक २४४ मध्ये आरोपींनी बिबट्याची शिकार करून चमडा, ११ नखे बाळगल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची कारवाई १७ जानेवारी रोजी करण्यात आली. आरोपींना कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
विनायक मनिराम टेकाम (३९) रा.वागदरा, मोरश्वर वासुदेव बोरकर (४५) रा. रामगड, मंगलसिंग शेरकू मडावी (५०) रा. वागदरा ता.कुरखेडा जि.गडचिरोली असे आरोपींची नावे आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे मंगळवार १७ जानेवारी रोजी वनकर्मचाऱ्यांनी सापळा रचला असता आरोपींकडून बिबट्याचा चमडा तसेच ११ नखे आढळून आली. दरम्यान चमडा व नखे जप्त जप्त करून आरोपी विरुद्ध वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ५० (c), भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ६४ (१) नुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
सदर कारवाई रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपुर, प्रितमसिंग कोडापे, विभागीय वन अधिकारी (दक्षता), नागपुर तसेच डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, धनंजय वायभासे, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) वडसा यांच्या मार्गदर्शनाल मनोज चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा, बालाजी डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) पुराडा, संजय कंकलवार, क्षेत्र सहाय्यक रामगड, कामचंद्र ढवळे, क्षेत्र सहाय्यक पुराडा, भरत रामपुरकर, बिटरक्षक रामगड, अमर कन्नाके, बिटरक्षक डोंगरगांव, शामराव कुळमेथे, बिटरक्षक लवारी सुरेश रामटेके, बिटरक्षक आंधळी, कु. सुनंदा मडावी, बिटरक्षक चिपरी, गंगाधर मेने, बिटरक्षक हाडकिकन्हार, गंगाधर नन्नावरे, बिटरक्षक पुराडा यांनी केली असून पुढील तपास धनंजय वायभासे, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) वडसा यांच्या मार्गदर्शनात मनोज चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी कुरखेडा, बालाजी डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, (प्रादेशिक) पुराडा, संजय कंकलवार, क्षेत्र सहाय्यक रामगड हे करत आहेत. सदरील प्रकरणामध्ये वन्यजीव शिकारीची सराईत टोळी सापडण्याची शक्यता आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli Forest) (Gadchiroli News Updates)