The गडविश्व
गडचिरोली, २८ मार्च : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रविवारपासून सुरू केलेल्या ‘रिपब्लिकन जनसंपर्क अभियानाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या अभियानाचा शुभारंभ पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या हस्ते गुरवळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्राचार्य प्रकाश दुधे, विदर्भ सचिव केशोराव सम्रुतवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानादरम्यान कार्यकर्त्यांनी राखी, विहीरगाव, चांदाळा, कारवाफा, चातगाव, धानोरा, येरकड, मोहली, रांगी, निमगाव या गावांना भेटी देऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या व रिपब्लिकन पक्षाने दलित व मागासवर्गीयांसाठी केलेला ऐतिहासिक लढा सांगितला. यावेळी नेत्यांनी रिपब्लिकन चळवळीच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून वाढत्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आणि लोकशाही व देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी पक्षात सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले.
गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे या मोहिमेचे स्वागत केले आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने स्वीकारले. या मोहिमेदरम्यान विविध गावांमध्ये शेकडो नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. प्रचाराचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले.
या मोहिमेत रमेश बारसागडे, विशालसिंग परिहार, भानुदास बांबोडे, प्रल्हाद उंदिरवाडे, ललित टेंभुर्णे, किशोर वहाणे, चत्रु हलामी, जगदीश सहारे, सुमन वालदे, विलास शिंपी, लोकमित्र रायपुरे, विश्वनाथ बारसागडे, वसंतराव मेश्राम, जनार्दन बांबोळे, तुफान मेश्राम, नृपनाथ खोब्रागडे, मिलिंद वासनिक, एकनाथ नागराळे, मेघराज टेम्भूर्णे, आकाश मेश्राम, जनार्दन बांबोळे, संगीत सेमस्कार, प्रियांका उंदीरवाडे, करिष्मा बांबोळे, ललिता टेम्भूर्णे व इतर शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(The gadvishva) (the gdv) (gadchiroli) (Republic)