गडचिरोली : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज

127

– उष्मघातापासुन बचावा करिता मतदान केंद्रात उष्मघात कक्ष
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुक – २०२४ चा पहिला टप्यात गडचिरोली- चिमुर मतदारसंघाची निवडणूक येत्या १९ एप्रिल २०२४ रोजी आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत आरोग्य संस्था व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आलेल्या आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम जिल्हा असून येथे सदर निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात या जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अहेरी, आरमोरी, कुरखेडा (३ उपजिल्हा रुग्णालय), चामोर्शी, आष्टी, धानोरा, वडसा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, कोरची, सिरोंचा ( ९ ग्रामीण रुग्णालय) असे १४ रुग्णालये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत वैद्यकीय यंत्रणा व वैद्यकीय पथक कार्यान्वित आहेत. या कार्यालयामार्फत उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली (जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली) यांना मतदान केंद्राच्या प्रकारानुसार अतिसंवेदनशील, संवेदनशील, क्रिटीकल मतदान केंद्र मिळून एकुण ४५० तसेच सर्वसाधारण मतदान केंद्रात एकुण ५७२ असे एकुण १०२२ प्राथमिक उपचार किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. सर्व एकुण १४ जिल्हा/महिला/उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय, येथे प्राथमिक उपचार करिता तसेच निवडणूकी दरम्यान मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व मतदार यांना उष्मघातापासुन बचावा करिता उष्मघात कक्ष तयार करण्यात आलेले आहे. संबंधित उष्मघात कक्षात कोल्ड रुम (कुलररहित), थंड पाण्याची व्यवस्था, ईमरजन्सी ट्रे, औषधसाठा उपलब्ध करुन ठेवण्यात आलेले आहे. आरोग्य विभागामध्ये एकुण १०८ ची १० वाहने व १०२ ची एकुण ३२ अशी एकुण ४२ वाहने कार्यरत ठेवण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त प्राथमीक आरोग्य केंद्रामधील ५१ वाहने व प्राथमीक आरोग्य पथक मधील २० वाहने सुसज्ज ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत समन्वय साधले आहे. या अनुषंगाने लोकसभा निवडणुक – २०२४ यासंबंधी कार्यालयीन तसेच वेळोवेळी सुचनेकरिता व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आलेले आहे. याबाबत सर्व वैद्यकीय अधिक्षकांना तत्पर राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalarrest #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here