– मंगलयान ११ विरुद्ध गगनयान ११ झुंजणार तर करंडकसाठी अग्नी ११ वि.ब्रमोस ११ आमने-सामने
The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर अप्पर डिप्पर प्रीमियर लीग व करंडक क्रिकेट स्पर्धेचा समारोप उद्या २८ जानेवारीला पार पडणार आहे. दरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना यावेळी खेळवला जाणार असून करंडकसाठी सकाळी ८ वाजता अंतिम सामना तर अप्पर डिप्पर क्रिकेट स्पर्धा लीगचा अंतिम सामना सकाळी १० वाजता गगनयान ११ विरुद्ध मंगलयान ११ असा होणार आहे.
अप्पर डिप्पर प्रीमियर लीग मध्ये मंगलयान११, शुक्रयान ११, गगनयान ११ व चंद्रयान ११ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मंगलयान ११ आणि गगनयान ११ या दोन संघात अंतिम सामना उद्या सकाळी १० वाजता रंगणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारानी उत्कृष्ट खेळ करून विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे.
मंगलयान ११ संघ : यशवंत दुर्गे (संघमालक),विभास विश्वास, पंकज घोरमोडे, मनोज पिपरे, अजय सहारे, विजय सूनतकर, संदिप कांबळे, तुषार मडावी, मिलिंद खोंड, मयूर रहाठे, तुषार चोपकर, प्रेमकुमार दुर्गे, राजू सहारे.
गगनयान ११ संघ : अनुराग पिपरे,(संघमालक), गजेंद्र डोमळे(कर्णधार), आशिष भरणे, कुलदीप गौरकर,मनोज वनकर, नितीन चलाख, प्रदीप मडावी, किशोर भाचभाई, अशोक फुकटे, शेखर फुलमाळी,योगेश बुरांडे, नितीन ठाकरे, शुभम येरावार.
तर करंडक क्रिकेट स्पर्धेत ब्रमोस ११ विरुद्ध अग्नी ११ यांच्यात झुंज होणार आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन- दोन सामने जिंकून करंडकात बरोबरी साधली आहे. निर्णायक सामन्यात जो विजेता होईल त्याला अप्पर डिप्पर करंडक विजेता घोषित करण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या अंतिम सामन्याकरिता क्रिकेटप्रेमींनी जिल्हा प्रेक्षगार मैदानावर उपस्थिती दर्शवून अंतिम सामन्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन अप्पर डीप्पर क्रिकेट लीग स्पर्धेतील आयोजकांनी केले आहे.