गडचिरोली : दोन कारमध्ये भीषण अपघात

2295

– अनेक जण गंभीर जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली–आरमोरी मुख्य मार्गावरील चुरमुरा गावाजवळ आज १० जून रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोन कारमध्ये समोरासमोर जबर धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात दोनपेक्षा अधिक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची तीव्रता इतकी होती की एक कार रस्त्यालगत असलेल्या शेणखताच्या ढिगाऱ्यात जाऊन आदळली, तर दुसरी कार मुख्य मार्गावरच क्षतिग्रस्त अवस्थेत उभी होती. दोन्ही वाहनांच्या समोरील भागांचे मोठे नुकसान झाले असून वाहनांचे समोरचे भाग अक्षरशः चक्काचूर झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. कारमधील एअरबॅग्स अपघातावेळी उघडल्याने गंभीर जीवितहानी टळल्याची शक्यता व्यक्त होत आहे. बातमी लिहेस्तव जखमींचे नाव कळू शकले नाही.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #armroi #accident #churchura)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here