गडचिरोली : कुजलेल्या अवस्थेत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

1307

– अद्यापही ओळख पटली नाही
The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑगस्ट : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात कुजलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याबाबत बामणी उप पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे असे कळते.
पोचमपल्ली येथील मलय्या दुर्गम यांच्या शेतात कपाशीची लागवड केली असून सदर कपाशीत एका इसमाचे प्रेत आढळले व त्याची दुर्गंधी सुटली, याबाबतची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता जवळपास ४० ते ४५ वयाच्या अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिसून आले. तात्काळ याबाबत बामणी उप पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. मृतदेह कुजलेल्या असवस्थेत असल्याने त्या व्यक्तीची अद्यापही ओळख पटली नाही असे कळते. सदर इसमाची उंची अंदाजे ५ फुट ७ इंच असून त्याच्या अंगात कत्त्या रंगाची टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा फुल पॅन्ट आहे अशी माहिती बामणी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मदन मस्के, चौकशी / अधिकारी पीएसआय संभाजी मुंडे यांनी कळविले आहे. सदर मृतदेहाची ओळख पाठविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. नदीकाठावर असलेल्या शेतात मृतदेह आढळल्याने सदर मृतदेह हा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून आला असावा असा तर्कही लावण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here