– वनविभागात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली, ८ जानेवारी : तालुक्यातील अमिर्झा बीटात वाघाच्या दोन बछड्यांचे अवशेष आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
अमिर्झा परिसरात टी-६ वाघाणीचा वावर असून परिसरात धुमाकूळ घालत मानवावर हल्ले वाढत असल्याने या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र काही दिवसानंतर त्या वाघिणीला ४ बछडे असल्याचे निष्पन्न झाल्याने जेरबंद करण्याचे आदेश तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र तरी सुद्धा या वाघिणीची दहशत कायम होती व हल्ले होत असल्याने पुन्हा या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले. वाघिणीला जेरबंद करण्याची तयारी सुरू असतांनाच त्याच परिसरात वाघाच्या २ बछड्यांचे अवशेष आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर सदर मृतक बछडे हे त्याचं वाघाणीचे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ३ जानेवारी रोजी एका बछड्याचे अवशेष आढळले व त्यानंतर ६ जानेवारी रोजी पुन्हा २०० मीटर अंतरावर दुसऱ्या बछड्याच्या मृतदेहाचे अवशेष आढळले. अवशेष हैदराबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार असून डीएनए चाचणी होईल. त्यानंतर सदर बछडे नेमके कोणत्या वाघाचे आहेत हे स्पष्ट होणार आहे.या परिसरात विविध श्वापद असून कोणत्यातरी श्वापदाने बछड्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

(The Gadvishva) ( Gadchiroli News Updates) (Selection of three athletes from Gadchiroli district for Mini Olympic Games) (The Gadvishava) (Gadchiroli News) (Sports) (Liverpool vs Wolves) (Serie A) (Odisha FC) (Liverpool FC) (Tiger gadchiroli)