गडचिरोली : जामिनावर असलेल्या महिलेची निघृण हत्या

34

गडचिरोली : जामिनावर असलेल्या महिलेची निघृण हत्या
– नवरात्राच्या पहिल्याच दिवशी पुलखल गाव हादरले
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : ऐन नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या पुलखल गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या महिलेची आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव ललिता देवराव गेडेकर (५५, रा. पुलखल) असे असून, ती २०२२ मध्ये झालेल्या कैलास रामकृष्ण मेश्राम खून प्रकरणातील आरोपी होती अशी माहिती आहे. त्यावेळी ललिता गेडेकर आणि तिचा मुलगा नरेश गेडेकर (२१) यांना पोलिसांनी अटक केली होती. नरेश गेडेकर सध्या चंद्रपूर कारागृहात असून ललिता गेडेकर गेल्या दोन वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आली होती. त्या काळापासून ती आपल्या सून ज्योत्स्ना गेडेकर हिच्यासोबत पुलखल गावात राहत होती.
आज सकाळी सुमारे आठच्या सुमारास शेतात जात असताना ललिता गेडेकर हिच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार केले. ती गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळली. दरम्यान, तिने ‘वाचवा-वाचवा’ असा आर्त आवाज दिला. गावकऱ्यांनी शोध घेतला असता, धानाच्या शेतात तिचा मृतदेह पडलेला आढळला.
या घटनेप्रकरणी रामकृष्ण मेश्राम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा यांसह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तपासाचे काम पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून जुन्या वादातून हत्या झाल्याचे परिसरात बोलल्या जात आहे.
या खुनामुळे पुलखल गावात भीतीचे वातावरण पसरले असून नवरात्राच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #MurderCase #PulKhal #CrimeNews #Navratri #BreakingNews #Maharashtra #PoliceInvestigation #GadchiroliPolice #CrimeReport

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here