गडचिरोली : तब्बल साडेसहा किलो गांजा केला जप्त

1386

– ७ लाख १९ हजार ६९० रुपयांच्या मुद्देमालासह तीन आरोपींना अटक
The गडविश्व
गडचिरोली, २९ मे : गोपनिय माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोच्या सुमारास शहरातील इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान तब्बल ७ लाख १९ हजार ६९० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह साडेसहा किलो गांजा जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने २७ मे रोजी केली. याप्रकरणी आशिष धनराज कुळमेथे (२८), रा. संजयनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, धनराज मधुकर मेश्राम (३३), रा. नेहरुनगर, चंद्रपुर ता.जि.चंद्रपुर, कु. ज्योती श्रीकृष्ण परचाके (२२), रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर यांना अटक करण्यात आली आहे.
२७ मे रोजी मिळालेल्या गोपीनिय माहितीच्या आधारे इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान एम.एच.३४ बी.आर.४०८६ क्रमांकाच्या वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनाचे डिक्कीत एकुण ९९,७९० रुपये किंमतीचा ६.६४६ कि.ग्रॅ. गांजा, ६,००,००)/- रु. किमतीचे चारचाकी वाहन तसेच २०,०००/- रुपये किंमतीचे मोबाईल असा एकुण ७,१९,६९०/- रु किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा अंमली पदार्थ (गांजा), मोबाईल तसेच गांजा वाहतुकीकरीता वापरण्यात आलेली स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त करुन आरोपीतांविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन गडचिरोली येथील मपोउपनि संघमित्रा बांबोळे करीत असुन आरोपीतांना मा.न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीना ३१ मे २०२३ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला असुन सदर गुन्ह्राचा तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात मसपोनि. रुपाली पाटील, पोहवा/ नरेश सहारे, पोहवा/ हेमंत गेडाम, पोना/सतिश कत्तीवार, पोना/राकेश सोनटक्के, पोशि/उमेश जगदाळे, पोशि/सचिन घुबडे, पोशि/माणिक दुधबळे, मपोहवा/लक्ष्मी बिश्वास, मपोना/सविता उसेंडी, चापोना/माणिक निसार, चापोना/मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.©©© (टीप : बातमी स्वमनाने लिहिता येत नसेल तर कॉपी पेस्ट जशीच्या तशी करा)
(the gdv, the gadvishva, gadchiroli police lcb , gadchiroli lcb, ganja, indiranagar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here