The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : पोलीस स्टेशन धोडराज हद्दीतील भटपार गाव जंगल परिसरातील घोटपाडी पहाडी जवळ माओवाद्यांनी सुरक्षा रक्षक दलास नुकसान व घातपात करण्याच्या उद्देशाने खडा बनवून त्यात लावण्यात आलेल्या लोखंडी टोकदार सलाखी (Spikes) तसेच कुकर मध्ये ठेवलेले आयडी सदृश वस्तू, वायर व बॅटरी भटपार गावातील नागरिकांनी गुरुवार २० जून रोजी स्वतःहून पोलीस स्टेशन ला जमा केल्या व यासोबतच तेथील गावकऱ्यांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज प्रभारी अधिकारी यांचेकडे सुपुर्द केला. यापुर्वीही १४ जून २०२४ रोजी पोस्टे धोडराज हद्दीतील सात गावातील नागरिकांनी माओवाद्यांना गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता.
जिल्हयात माओवादी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह, निवडणूक तसेच इतर प्रसंगी केला जातो.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ च्या अनुषंगाने पोलीस पथकाला नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी माओवाद्यांनी आय.ई.डी. हल्ले आणि क्लेमोर माईन्स मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहीत्य पुरुन ठेवले होते. परंतू गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावकयांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावकयांचा विश्वास दृढ झाला. त्यामुळे माओवाद्यांचा सुरक्षा रक्षक दलास नुकसान पोहचविण्याचा व घातपात करण्याचा कोणताही मनसूबा यशस्वी होऊ शकला नाही.
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाऱ्या भटपार येथील नागरिकांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अतिदुर्गम भागातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bhamragad #dhodraaj #spnilotpal )