– दोन शिक्षक व एका कारकुणाचा आरोपीच्या समावेश
The गडविश्व
गडचिरोली, ११ जून : जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवुत्तीत वाढ होतांना दिसत आहे. विविध घटनेने जिल्हा खळबळून जात असून अशी एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. एका अल्पवयीन मुलाचा फायदा घेत त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तिघांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. तर न्यायालयात हजर केले असता आरोपींना १५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचेही कळते. या घटनेतील आरोपी हे डॉ। शिक्षक तर एक न्यायालयात कारकून आहे. सदर घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आरोपीमध्ये अक्षय दादाजी रामटेके, पवन अभिमन्यू रामटेके, दोघेही रा. तुळशी, ता. देसाईगंज व भूपेश मोहनलाल कनोजिया रा. देसाईगंज यांचा समावेश आहे. यातील अक्षय रामटेके हा गडचिरोली न्यायालयात कारकून असून, पवन रामटेके व भूपेश कनोजिया हे दोघेही शिक्षक आहेत.
सुत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या वडिलांच्या दुकानात अक्षय रामटेके हा अधूनमधून जात असे. दरम्यान सुट्टीच्या काळात पीडित मुलगा दुकानात बसत असल्याने त्याची अक्षयशी ओळख झाली. अल्पवयीन असल्याचा फायदा घेत अक्षय हा जबरदस्तीने पीडित मुलगा नकार देत असतांनाही अत्याचार करीत होता. तसेच अक्षयने इतर दोन आरोपींना याबाबत माहिती दिली असता तेसुद्धा त्या मुलाचे लैंगिक शोषण करू लागले. सदर प्रकार मागील पाच वर्षांपासून सुरू होता अशी माहिती असून आरोपीपैकी एकाचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले. परंतु त्याच्या वागणुकीवरून शंका उपस्थित झाल्याने अत्यंत जवळच्या व्यक्तीने सखोल चौकशी केली असता या प्रकरणाचे बिंग फुटले. दरम्यान त्यानंतर पीडित मुलाच्या तक्रारीवरुन तीन जणांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली व आरोपींना १० जून रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती आहे. तर या प्रकरणाची आधील चौकशी झाल्यास आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिंग फुटल्याने प्रकरण उघडकीस
मागील पाच वर्षांपासून लैंगिक शोषण होत होते. मात्र लैंगिक शोषण करणाऱ्या एकाचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला मात्र त्याच्या वागणुकीवरून अत्यंत जवळच्या व्यक्तीला शंका उपस्थित झाल्याने सखोल चौकशी केली असता बिंग फुटून प्रकरण उघडकीस आले. यापूर्वीही गडचिरोली येथे अशाचप्रकारे एका कपडा व्यापाराशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून चित्रफीत तयार करत ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी त्यातील आरोपींना अटक करण्यात आली.
सदर प्रकणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलिसांच्या पुढील तपासाने ते समोर येणार आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news update, desaiganj, crime news updates)