गडचिरोली : पत्रकारास शिवीगाळ व धमकावने भोवले, तिघांवर गुन्हा दाखल

747

देसाईगंज तालुक्यातील प्रकरण
The गडविश्व
गडचिरोली, २७ फेब्रुवारी : विविध बातम्यांच्या माध्यमातून अवैधरित्या चालणाऱ्या प्रकरणाला वृत्तातून उजाळा दिल्याने पत्रकारास शिवीगाळ व धमकवणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात घडला आहे. सदर प्रकरणी तिघांविरुद्ध पोलीस ठाणे देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. अक्षय राऊत (२६), संतोष धोटे(२९) व भास्कर धोटे (३६) रा. कोंढाळा ता.देसाईगंज जि.गडचिरोली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील व इतर गौण खनिजांच्या शासनाच्या संपत्तीला चुना लावणाऱ्या व अवैधरीत्या तस्करी करणाऱ्यांविरोधात ‘उद्रेक न्युज’ पोर्टल चे संपादक तथा ‘विदर्भ की दहाड’ चे प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी वारंवार अवैध तस्करी विरोधात शासनाच्या चोरी होणाऱ्या खनिज संपत्ती विषयी आळा घातला जावा याकरिता वृत्तांच्या माध्यमातून प्रकरण उघडकीस आणले. अवैध रेती उपसा बाबत बातम्या प्रसारित केल्याने गावातील काही गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तिंद्वारे ‘रेतीच्या बातम्या कशाला प्रकाशित करतो’ म्हणून शिवीगाळ व पाहून घेण्याच्या धमक्या पत्रकार सत्यवान रामटेके यांना दिल्याने याबाबतची तक्रार देसाईगंज पोलीस ठाण्यात दिली असता तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.
कोंढाळा वैनगंगा नदी घाटातून बऱ्याच महिन्यांपासून शासनाच्या खनिज संपत्तीची अवैधरीत्या रेती वाहतूक केली जात आहे. शासनाच्या खनिज संपत्तीच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी बातम्या प्रसारित केल्याने कोंढाळा वैनगंगा नदी घाटातील मेंढा घाट, सिंदराई घाट व नव्याने सुरू करण्यात आलेल्या घाटांवर महसूल विभाग खळबळून जागे होऊन अवैधरीत्या रेती तस्करीवर चाप बसविण्याकरीता खड्डे मारण्यात आले. मात्र हल्ली पिंपळगाव वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणावर शासनाच्या खनिज संपत्ती असलेल्या रेतीची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याने ‘उद्रेक न्युज’ पोर्टल चे संपादक तथा ‘विदर्भ की दहाड’ चे प्रतिनिधी सत्यवान रामटेके यांनी बातम्या प्रसारित करून सदर प्रकरण उजेडात आणण्याचा प्रयत्न केला असता,कोंढाळा येथील अक्षय राऊत,संतोष धोटे व भास्कर धोटे यांनी धमकीवजा बोलणी करून शिवीगाळ केली. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ गणल्या जाणाऱ्या पत्रकारास दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा गुंड प्रवृत्तींच्या मनोविकृतांची दादागिरी आणखी वाढतच जाणार असल्याने अशांवर आवर घालणे गजेचे असल्याने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ५०६ अंतर्गत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News updates) (Desaiganj) (Satyvan Ramteke) (Udrek News) (Vidarbh Ki Dahad) (Gadchiroli: A journalist was abused and threatened, a case was registered against three)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here