गडचिरोली : चिमुकल्यांनी तयार केले पक्षांसाठी ३० वॉटर फिडर

716

– प्रत्येक शाळेतील मुलांनी पाणपोई सुरू करावी म्हणून सीईओना लिहिले पत्र
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, १८ मार्च : उन्हाच्या कडाक्‍यामुळे आपल्या घशाला कोरड पडतेय, तर मग पक्ष्यांचे काय होत असेल ! मार्च महिना आला की पाण्याअभावी माणसाची जशी “काहिरी” होते, तसे हाल पशु पक्षांची होत असेल. हीच जाणीव लक्षात घेत आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील ज्ञानगंगा अभ्यासिकेतील चिमुकल्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी ३० पाणपोई तयार केल्या आहे. तसेच अशी पाणपोई इतर गावातील मुला मुलींनी सुद्धा सुरू करावी यासाठी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांना पत्र सुद्धा लिहिलेले आहे.
आता उन्हाळ्याची चाहूल लागली असून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी भरवल्या जात आहे. शाळा सुटल्यानंतर मुलांना अभ्यास करता यावा. मुले इतरत्र फिरण्यापेक्षा एकत्र येऊन पुस्तके वाचतील या दृष्टिकोनातून आश्रय जन फाउंडेशन अंतर्गत ज्ञानगंगा अभ्यासकेची सुरुवात केली आहे. या अभ्यासिकेचे संयोजक वाल्मीक नन्नावरे यांनी आज पक्षांसाठी वाटर फीडरची कल्पना मुलांजवळ मांडली. अभ्यासिकेतील मुला मुलींनी प्लास्टिक बिसलेरी बाटल, डबकी, डब्बे हे टाकाऊ सामान गोळा करून आणले. या साहित्यापासून त्यांनी तब्बल ३० पाणपोई तयार केल्या आहेत. त्या प्रत्येक पाणपोईवर प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव लिहिलेले आहे. ज्याच्या नावाची ती पाणपोई आहे. तो विद्यार्थी दररोज त्या वॉटर फिडर मध्ये पाणी टाकेल. गावातील जवळपास सर्व झाडांवर पाणपोई लावण्यात आल्या आहेत. पाणपोई लावल्या बरोबर पाण्याच्या शोधात असलेले पक्षी येथे गर्दी करतांना दिसत आहे. आता ह्या चिमुकल्यांच्या अभिनव प्रयोगाची चर्चा गावभर होत आहे.
या विद्यार्थ्यांनी घरी सुद्धा पाणपोई तयार करण्याचा संकल्प केला आहे. अशा पद्धतीचे काम इतर गावचे मुलंमुली करत असतील का असा प्रश्न एका मुलीला पडला ? यावर अभ्यासिकेच्या संयोजकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्याची विनंती करू शकतो अशी कल्पना मांडली. ही कल्पना विद्यार्थ्यांना आवडली आणि त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र सुद्धा लिहिले.

उन्हाळ्यामध्ये दुपारची शाळा बंद झाली आहे. दुपारी गावातील मुलं इतर वणवन भटकण्यापेक्षा त्यांनी अभ्यास करावा. वाचन करावा. यासाठी मी घरीच ज्ञानगंगा अभ्यासिकेची सुरुवात केली. या अभ्यासिकेत मुले दुपारीच वही पेन पुस्तक घेऊन येतात. या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबत पशुपक्षी निसर्ग यांच्या प्रति संवेदनशीलता निर्माण व्हावी. म्हणून त्यांना मी पक्ष्यांसाठी पाणपोईची कल्पना बोलूनन दाखवली. मुलांनाही खूप आवडली आणि त्यांनीच टाकाऊ साहित्य गोळा करून आणले. आणि मी सांगितल्याप्रमाणे पाणपोई तयार केल्या.
– वाल्मीक नन्नावरे
संयोजक, ज्ञानगंगा अभ्यासिका

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here