गडचिरोली पोलिस दलात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन : 760 अधिकाऱ्यांची तपासणी

130

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्य संवर्धनासाठी गडचिरोली पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व 31 मे 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय मंगल कार्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट येथे हे शिबिर पार पडले. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, सी-60, SOG, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसह एकूण 760 अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
या तपासणीमध्ये ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल, सीबीसी, मूत्रपिंड व यकृत कार्य, थायरॉईड, रक्तदाब यांसह इतर विविध तपासण्या करण्यात आल्या. या उपक्रमामुळे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची मौकाही मिळाली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोळंकी, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने मोलाची भूमिका बजावली.
या उपक्रमासाठी पोलिस कल्याण शाखेचे प्रभारी पोउपनि नरेंद्र पिवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील भागात सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here