माजी जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण

5948

– रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
गडचिरोली, २० एप्रिल : जि.प. गडचिरोलीचे माजी सदस्य तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती पुढे येत आहे.
चामोर्शी पोलीस ठाण्याला नुकतेच नव्याने रूजु झालेले पोलीस निरीक्षक खांडवे यांनी अतुल गण्यारपवार यांना पहाटे पाच वाजताच्या सुमारास बेदम मारहाण केल्याची माहिती पुढे येत आहे. खांडवे यांनी जोड्याने आणि बाजीराव पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपावर यांनी केला असून या मारहाणीत गण्यारपवार यांचा डावा हात फक्चर झाला तर मानेला गंभीर दुखापत झाल्याचे कळते. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही कळते. गण्यारपवार यांना कोणत्या कारणाने मारहाण करण्यात आली याबाबत अदयाप कळु शकले नाही.

(the gdv) (the gadvishva) (atul ganyarpawar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here