‘सर्च’ रुग्णालयातील पोटविकार व हृदयरोग ओपिडीला उत्कृष्ट प्रतिसाद

32

The गडविश्व
गडचिरोली, १६ फेब्रुवारी : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात नागपूर येथील पोटविकार तज्ञ डॉ. सिद्धार्थ धांडे व तसेच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय माहूरकर यांच्या सहकार्याने नियमित पोटविकार व हृदयरोग ओपिडीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोटविकार ओपीडी व दुसऱ्या शनिवारी हृदयरोग ओपीडी ठेवण्यात येत असून रुग्णांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
४ फेब्रुवारी २०२३ ला झालेल्या पहिली पोटविकार ओपीडीचा ५७ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये पोटातील अल्सर, गिळण्यामध्ये अडचण व वेदना होणे, पित्ताशयातील खडे, छातीत जळजळ, पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता,शौचातून रक्त पडणे,कावीळ(पांढरी व पिवळी), रक्ताची उलटी, असामान्य आतड्याची हालचाल, मळमळणे, आतड्या मधील सुज, पातड शौच, अल्कोहोलिक लिव्हरडिसीज, पोटात पाणी असणे अश्या आजारावर उपचार करण्यात आला. ११ फेब्रुवारी २०२३ ला झालेल्या हृदयरोग ओपिडीचा ६४ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये छातीत दुखणे, छातीत धडधड होणे, चालताना धाप लागणे, डावा हात दुखणे, पोटाच्या वरील भागात दुखणे याशिवाय जळजळ होऊन घाम येणे, घाबरल्यासारखे होणे या हृदयरोगाची लक्षणे असलेल्या व हृदय विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आला. काळाची गरज समजून आणि रुग्णांमधील गुंतागुंतीच्या वाढत्या प्रवृत्तीचा विचार करून चातगाव येथील ‘सर्च’ हॉस्पिटलमध्ये पोटविकार ओपीडी’ व हृदयरोग ओपिडीला सुरुवात करण्यात आली आहे. तरी या ओपिडीचा लाभ रुग्णांनी नियमित ओपिडी असलेल्या दिवशी घ्यावा, असे आवाहन सर्चच्या वतीने करण्यात आले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here