एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल अहेरी येथील सत्र २०२५-२६ करीता प्रवेशपुर्व परिक्षा

53

– अनुसुचित जमातीच्या /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ६ ते ९ वर्गात प्रवेशपुर्व परिक्षा
The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात आदिवासी क्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल, अहेरी ता. अहेरी जि. गडचिरोली येथील प्रवेश देण्याबाबतची योजना सुरु आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ६ वी च्या CBSE तसेच इयता ७ वी ते ९ वी चे वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या CBSE एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, अहेरी ता. अहेरी जि. गडचिरोली येथे प्रवेशासाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सर्व जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपालीका शाळा व इतर प्राथमिक / माध्यमिक शाळेतील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्गात शिकत असलेले, परंतु ज्या पालकांचे उत्पन्न रुपये सहा लक्षपेक्षा कमी आहे, अशाच पालकांचे अनुसुचित / आदिम जमातीचे पाल्य (विद्यार्थी) हे सदर स्पर्धा परीक्षेत बसण्यास पात्र राहील.
सदर स्पर्धा परीक्षा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वर्ग ६ वी ची सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत तसेच वर्ग ७ वी ते ९ वी ची परीक्षा सकाळी ११.०० ते २.०० या कार्यालयामार्फत ठरविलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. इयत्ता ६ वी चे परीक्षा प्रवेश अर्ज व इयत्ता ७ वी ते ९ वी परीक्षा प्रवेश अर्ज ३० जानेवारी २०२५ या अंतिम तारखेपर्यंत प्राचार्य/मुख्याधापक यांचे मार्फत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे कार्यालयीन वेळेतच अर्ज स्वीकारल्या जातील.
सदर परीक्षेचे अर्ज प्रकल्प अहेरी अंतर्गत येत असलेल्या सर्व आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल, अहेरी जि, गडचिरोली येथे उपलब्ध असतील व अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
नमूद उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या शासकीय / निमशासकीय सेवेत कर्मचाऱ्यांच्या / पालकांच्या पाल्यांना एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेश देता येणार नाही व पालकांनी खोटी माहिती सादर केल्यास त्यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कार्यालय- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, खमनचेरु रोड अहेरी यांचेकडे ३० जानेवारी २०२५ पुर्वी संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक 07133-272031 असा आहे. असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी कुशल जैन यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here