निवडणूक विषयक तक्रारी द्यायची आहे ; ‘यांना’ करा संपर्क

107

-निवडणूक निरीक्षक अनिमेष कुमार पराशर गडचिरोलीत दाखल
The गडविश्व
गडचिरोली दि. २७ : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अनिमेष कुमार पराशर (भा.प्र.से.) हे आज गडचिरोली येथे दाखल झाले आहेत.
निवडणूक निरिक्षक पराशर सर्किट हाऊस कॉम्पलेक्स येथील मार्कंडा कक्षात ते मुक्कामी आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक 9420067626 असून कार्यालयीन संपर्क क्रमांक 07132233184 असा आहे. त्‍यांच्याकडे निवडणूक विषयक कामकाजासंदर्भातील तक्रारी प्रत्यक्ष भेटून सकाळी 11 ते 12 या वेळेत देता येतील किंवा मोबाईलवर संपर्क साधता येईल.
तसेच निवडणूक खर्च निरिक्षक एस. वेणुगोपाल हे सर्किट हाऊसमधील चपराळा या कक्षात मुक्कामी आहेत. निवडणुक खर्चविषयक तक्रारी एस. वेणु गोपाल यांच्या 9420067690 या संपर्क क्रमांकावर द्याव्यात, असे निवडणूक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

(#thegadvishva #thegdv #loksabha_election2024 #loksabhaelection2024 #gadchirolinews #gadchirolichimur )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here