सोसायटीच्या दुर्लक्षीतपणामुळे लाखो रुपयांचे धान्य झाले खराब

649

– गोडावून नसतानाही खरेदी केंद्र दिले कसे ?
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत धानोरा तालुक्यातील मोहली या संस्थेमध्ये धानाची चालू खरीप हंगामात २११०० क्विटल धान्याची खरेदी करण्यात आली. गोडावून अभावी धान्य उघड्यावर साठवून ठेवण्यात आले खरे पण संस्थेला ताडपत्री पुरवून ही योग्य प्रकारे पावसाळा भर देखभाल न केल्याने पाणी आत घुसले आणि मोठ्या प्रमाणावर धान्य खराब झाले, काळे पडले, धान्य उगविल्याने या खराब धान्याची जबाबदारी कोण स्विकारणार ? की शासनाच्या माथी मारल्या जाईल असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.
२११०० क्विंटल धान्य खरेदी केले पण या धान्याची वेळीच उचल झालेली नाही. मोहली सोसायटी ने खरेदी केलेल्या धाना पैकी १२४९२.१९ क्विंटल धानाचे डिओ झाल्याचे कळते त्यात सार्थक राईस मिल वडसा ३२००.५६, विशाल राईस मिल ७६५, माँ शारदा राईस मिल कुरुड ४१७३.२८, जय अंबे राईस मिल वडसा ५२१.६०, १८४५.८२, महाकाली राईस मिल १७८६.८८. ही माहिती राजेश ठाकरे विपणन निरीक्षक टीडीसी धानोरा यांनी दिली. धान्य मोकळ्या जागेत उघड्यावर ठेवलेले असताना पावसाळ्यात पाणी पडला, अवकाळी पाऊस झाला. गोडावून अभावी उघड्यावर खरेदी करून पटांगणात मेनकापड ताडपत्रीने झाकून ठेवले खरे पण धान्य खराब झाले आणि संस्थेची पोल खोलली.
करोडो रुपयांचे नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न धानोरा तालुक्यातील लोक विचारत आहेत. संस्थेकडील धान्य वेळीच उचल करणे गरजेचे असतानाही वेळीच उचल झालेली नाही. आता खराब झालेल्या धान्यासाठी कोणाला जबाबदार धरले जाणार आहे. खरेदी केलेल्या धान्याची काळजी घेणे आवश्यक होते मात्र काळजी न घेतल्यामुळे धान्य खराब झालेले आहे. संस्थेकडे गोडावून नाही तर खरेदी केंद्र दिले कसे असा प्रश्न सुद्धा शेतकरी विचारीत आहेत. खराब झालेल्या धान्याची जबाबदारी कोण सोसनार असा प्रश्न लोक विचारत आहेत. आधारभूत धान खरेदी योजना आदिवासी उपयोजन क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ एजंट म्हणून स्थानिक सहकारी संस्थामार्फत राबविली जाते. या खरीप हंगामात मोहलि येथील सेवा सहकारी संस्थेनं २११०० क्विटल धान्याची खरेदी केली. पण धान्य उचले पर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संस्थेची असते. संस्थेने पाहिजे त्या प्रमाणात काळजी न घेतल्याने धान्य खराब झाल्याचे स्पष्ट दिसुन येते. उचल होण्यापूर्वी ऊनाने धान्य सुकतात, उंदिर खातात, घुस पोखरून नासधूस करते यामुळे टूट येते याचा नाहक भुर्दंड संस्थेला तर पडते त्यामुळे संस्था अडचणीत येत असतात. यातच भर अवकाळी पावसाची. तालुक्यातील कोणतीही संस्था स्थापनेपासून फायद्यात नसुन सर्वच तोट्यात दिसुन येतात. यामुळे पुन्हा संस्थेचे फावत असुन धान्य खराब झाल्याचे दाखविले जाते. यावर वेळीच कारवाई होने आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here