The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा. दि. ०८ : जिल्हा निधी अंतर्गत पशु संवर्धन विभाग पं.स.कुरखेडा व जिल्हा परिषद गडचिरोलीचे वतीने जिल्हा पशु प्रदर्शनी पंचायत समिती कुरखेडा च्या मैदानात घेण्यात ७ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली.
कार्यक्रमाला उदघटक म्हणून आमदर रामदास मसराम उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.विलास गाडगे जिल्हा पशुसर्वधंन उपायुक्त जिल्हा गडचिरोली यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या स्थानी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,जीवन पाटील नाट तसेच धीरज पाटील, गटविकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा , डॉ.अजय ठवरे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी , डॉ. मेश्राम सहा आयुक्त कुरखेडा, डॉ. दीपक मदीकुंटावर, सहा आयुक्त वडसा, डॉ शीतल ताराम सहा.आयुक्त धानोरा. डॉ.डी. पी.सहारे, पशुंधन विकास अधिकारी (विस्तार) पं.स. कुरखेडा, डॉ कपिल कोरेटी, भोगे विस्तार अधिकरी, डॉ. खंडाते इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रुपेश सक्सेना यांनी केले, प्रास्ताविक डॉ. कोरेटी यांनी व डॉ. गणेश काटवे सहा पशु विकास अधिकारी सोनसरी यांनी आभार मानले.
या प्रदर्शनी मध्ये परीक्षण करण्याकरिता अन्य जिल्ह्यातील पशुधन पर्यवेक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. जयंत सुकारे गेवर्धा ,डॉ.ब्राम्हणकर, डॉ. पाटील,डॉ .गजभिये मालेवाडा, डॉ. नैताम, डॉ.चौके, डॉ .निता जांभुळकर. तसेच तालुक्यातील सर्व कर्मचार , जिल्हातील सर्व पशु सावर्धन अधिकारी, पंचायत समितीतील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रदर्शनी मध्ये सहभागी गोपालकांना विविध गटामध्ये तीन क्रमांक देऊन रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय सहभागी सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर भेटवस्तू देण्यात आली.
