The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ ऑक्टोबर : धानोरा ते मुरुमगाव या मुख्य महामार्गावर चे खडीकरण व डांबरीकरणचे कार्य सहा महिन्या आगोदर शासनाने खाजगी ठेकेदाराकडून करण्यात आले होते. परंतु हाच रस्ता सध्या तरी अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे.
या मुख्य महामार्गावरचे खडीकरण व डांबरीकरण नव्याने करण्यात आले परंतु चार महिन्यातच मुसळधार पावसाने रस्त्याची वाट लावली. महामार्गावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत, दोन चाकी आणि चारचाकी वाहन विघ्ने कठिण कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खड्यात पाणी साचल्याने तलावाचे रुप धारण केले आहे. खाजगी ठेकेदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असावे त्यामुळे अवघ्या चार महिन्यांत महामार्गाची हि अवस्था निर्माण झाली आहे. सदर कंत्राटदारावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या मुख्य मार्गावर चे कार्य करताना कोणता मलिदा वापरला ज्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली. मार्गावर खड्डे निर्माण झाले आहेत. त्याच प्रमाणे सबंधित ठेकेदारने साईड मुरूम भरलेच नाही. कुठेही निशानी मार्गाचे फलक लावलेले दिसुन येत नाही. तसेच पांढरा पट्टा पन आता पर्यंत लावला नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने काम पूर्ण केले कि अधुरेच ठेवण्यात आले असल्याचे दिसून येते. या मुख्य महामार्गावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील हप्त्यात दोन गंभीर स्वरूपात अपघात होवून मृत्यू मूखी पडले आहेत. याला जबाबदार कोण? कोणताही सबंधित ठेकेदार मार्गाचे निर्माण कार्य करतो पण निर्माण कार्य परिपूर्ण करीत नाही, मार्गाचे निर्माण कार्य अपुर्ण का ठेवतात या कडे शासन व प्रशासन चे दूर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांची करताना दिसतात.
धानोरा ते मुरुमगाव महामार्गावर स्थिती गंभीर स्वरूपात होत चाललेली आहे आणी या मुख्य महामार्गावर सामोरच्या दृष्टीकोनातून अपघाताच्या संख्येत वाढ होऊ नये करीता सबंधित ठेकेदार व सबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून वेळीच उपाययोजना करणे गरजेचेच आहे हे मात्र खरे.
