धानोरा तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९०.७३ टक्के

124

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ जून : नुकताच २ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आले. यात धानोरा तालुक्याचा निकाल ९०.७३ टक्के लागला असुन तालुक्यात ३३ शाळा आहेत. त्यात तिन शाळेने १०० टक्के निकाल दिलेला आहे. तालुक्यात १०९१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले. त्यापैकी १०५८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले त्यापैकी ९६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १२४ विद्यार्थीनी डिस्ट्रिक्शन मिळविले आहे.
धानोरा तालुक्यामध्ये मॉडेल स्कूल मोहली, लालच्या मडावी कारवाफा, जय पेरसा पेन विद्यालय मांळदा या तीन शाळेने शंभर टक्के निकाल दिलेला आहे. तालुक्यातील इतर शाळेचे निकाल अनुक्रमे जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा ९५.२३ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रांगी ८३.७२ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा ८४.४४ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरूमगाव ९०.९० टक्के, महेश सावकार पोरेडीवर हायस्कूल चातगाव ९५.६५ टक्के, लिसिट हायस्कूल रांगी ८०.०० टक्के, धनंजय स्मृती विद्यालय अंगारा ८२.५० टक्के, श्री साईबाबा विद्यालय येरकड ८८.२३ टक्के, प्रियदर्शनी कन्या विद्यालय धानोरा ९७.२९ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पेंढरी ९६.२९ टक्के, जिल्हा परिषद हायस्कूल मोहली ८२.८१ टक्के, माध्यमिक आश्रम शाळा गिरोला ८९.७४ टक्के, स्वर्गीय रामचंद्र दखणे विद्यालय मुरूमगाव ९२.०० टक्के, जिजामाता हायस्कूल इरुपटोल ९१.३० टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोडे ९७.७७ टक्के, माध्यमिक आश्रम शाळा येरमागड ८२.७५ टक्के, गणेश अलंकार विद्यालय निमगाव ९० टक्के, राजीव गांधी विद्यालय कारवाफा ८६.६६ टक्के, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गोडलवाही ९० टक्के, जय पेरसापेन माध्यमिक शाळा जाभळी ९६.५५ टक्के, भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा गट्टा ९७.५६ टक्के, कै. हरीजी विठूजी मडावी माध्यमिक शाळा रांगी ३५ टक्के, शंकरराव बलमवार हायस्कूल मेंढाटोला ८७.५० टक्के, महाराष्ट्र हायस्कूल मुस्का ८५.७१ टक्के, मातृभूमी हायस्कूल पेंढरी ७० टक्के, अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा जपतलाई ९३.३३ टक्के, पल्लवी विद्यालय दुधमाळा ८४.६१ टक्के, अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा कामनगड ७८.५७ टक्के, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा ९१.३० टक्के, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ९२.५९ टक्के.
जिल्ह्याच्या पूर्व दिशेला डोंगराळ अति दुर्गम अशी ओळख असलेल्या धानोरा तालुक्यात एकूण ३३ माध्यमिक शाळा आहेत.१२४ विद्यार्थी डिस्ट्रिक्शेन मधे आहेत. ४३१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , द्वितीय श्रेर्णीत ३४३, पास ६२ असे वकुन ९६० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. निकालाची टक्केवारी ९०.७३ इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here