– संजय वड्डे यांची गट विकास अधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २१ : तालुक्यातील चिंगलि ग्रामपंचायतीने विद्युत विभागाअंतर्गत ग्रामवीज सेवक या पदावर संजय वड्डे या व्यक्तीची ११ महिन्यासाठी अतिशय कमी मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली खरी परंतु कार्यरत व्यक्तीचा नियुक्तीचा कालावधी १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. असे असूनही कोणतीही सुचना किंवा लेखी न कळवता चिंगलि पासून ७ कि.मी.अंतरावरील व्यक्तीला अर्ज न मागता की, जाहिरात न देता नियुक्ती करण्यात आल्याने हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. अशा पद्धतीने करार मोडणाऱ्या ग्रामसेवक सरपंचावर उचित कार्यवाही करण्याची मागणी गट विकास अधिकार पंचायत समिती धानोरा यांना १६ डिसेंबर २०२४ ला दिलेल्या निवेदनातून संजय वड्डे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माझी नियुक्ती कायम ठेवण्यासाठी ग्रामपंचायत चिंगली कार्यालयाला २५ नोव्हेंबर २०२४ रोजी पत्र दिले आहे. परंतु पत्राबाबत कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत ग्रामवीज सेवक पदावर पाच हजार रुपये मानधन तत्वावर नियुक्ती झाली आहे. पुर्ननियुक्तिचा आदेश कार्यरत व्यक्ती ला एमएससीबी (MSCB) ने दिले त्यानंतर फक्त ठराव जोडून परत कार्यालयाला पाठवायचे होते. आदेश १४ ऑगस्ट. २०२४ ते १३ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या कालावधी साठी अगदी तात्पुरत्या स्वरूपावर दरवर्षी ११ महिन्यासाठी नियुक्ती दिली जाते. पण मागिल महिन्यात मला न विचारता किवा नविन नियुक्ती अमोल जे.कुमोटी खैरीटोला यांची करण्यात आली. मात्र नविन नियुक्ती करण्यासाठी आवश्यक पात्र पाहिजे. याबाबत जाहिरात करण्यात आली नाही. ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली ती व्यक्ती स्थानिक ठिकाणची नसुन ग्रामपंचायतीने दुसऱ्या व्यक्तिची नियुक्ती केली. कार्यरत व्यक्ती मागिल आठ वर्षांपासून या पदावर आणि तेही फक्त ५ हजार रुपये मानधन तत्वावर. आदेश हातात असताना आणि कार्यरत असताना ग्रामपंचायतिने दुसऱ्याला नियुक्ती करणे कितपत योग्य आहे. ग्रामपंचायतीने नियमाला हरताळ फासल्याचे दिसून येते. सध्याचे नियुक्त व्यक्ती गावात राहात नाही ते शिक्षण घेत असल्याचे कळते आणि प्रत्यक्ष लाईनमनचे काम करनारे व्यक्ती खुशाल कस्तुरे असून ग्रामपंचायतिच्या कोणत्या नियमात बसते. मला अंधारात ठेवून दुसऱ्याची नियुक्ती करणे कितपत योग्य आहे. मला दिलेल्या आदेशाची पायमल्ली असून माझ्यावर ग्रामपंचायतिने अन्याय केला आहे त्यामुळे चिंगली ग्रामपंचायत येथील सरपंच, सचिवावर कारवाई करुन न्याय मिळवून देन्याची मागणी संजय महादेव वड्डे यांनी निवेदनातून केली आहे.
सदर प्रकरणाबाबत गट विकास अधिकारी काय पाऊल उचलतात याकडे लक्ष लागले आहे.
