धानोरा : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई

803

– ट्रॅक्टरला नंबरच नाही
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ मे : तालुक्यातील दूधमाळा येथील दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेती वाहतूक करीत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन करून जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर करवाईने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
धानोरा तालुक्यात सध्या रेतीचा एकच लिलावाचा घाट असल्याने धानोरा तालुक्यात बांधकाम करण्याकरिता मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याने शासनाने वेळीच कारवाई करणे आवश्यक होते. दूधमाळा येथील आशिष उईके व मुरली उईके या दोन व्यक्तीचे ट्रॅक्टर अवैध्य रित्या रेति वाहतूक करीत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर पकडून पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या स्वाधीन केल्यानंतर संबंधित विभागातील तलाठी कोडापे यांनी पंचनामा करून जप्तीची कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या एका ट्रॅक्टरचा रंग पांढरा तर दुसऱ्या ट्रॅक्टरचा रंग लाल आहे असून दोन्हीही ट्रॅक्टर विना नंबरप्लेटच्या दिसून येत आहेत. त्यामुळे अशा ट्रॅक्टर रोडवर चालविण्याची परवानगी शासन देतेच कशी ? नंबर मिळाला पण मालकाने बुद्धिपुरुस्कृत लिहिले नाही याची तपासणी होने गरजेचे आहे. या संशयास्पद ट्रॅक्टर असुन यात अवैध रेती असल्याची बाब लक्षात आल्याने पोलिसांनी सदर ट्रॅक्टर २५ मे रोजी दुपारी पोलीस स्टेशन धानोरा येथे जमा करण्यात आली. नंतर सदर ट्रॅक्टरची माहिती महसूल विभागाला कळवली असता महसूल विभागातील तलाठी कोडापे यांनी दोन्हीही ट्रॅक्टरचा पंचनामा केला. दरम्यान दोन्ही ट्रॅक्टर कडे रेती वाहतूक परवाना नसल्याचेही कळले. त्यामुळे सदर ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली मात्र ट्रॅक्टर जमा करत असताना अजून पर्यंत गाडी मालकावर गुन्ह्याची नोंद झालेली नाही किंवा शिफारस सुद्धा केलेली नाही असे सुद्धा कळते तर अवैध रेती तस्करांवर वेळीच नियंत्रण राखण्यासाठी गाडीमालकावर गुन्ह्याची नोंद करणे आवश्यक असून शासनाच्या वेगवेगळ्या कामांत अवैध रेतीचा सर्रास वापर होत असल्याने मोठ्या कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील लोक करित आहेत. तर तालुक्यात कंत्राटदार नविन बांधकामात सुद्धा अवैध रेतीचा वापर सर्रास सुरू असल्याचे सांगितले जाते.

तलाठी कोडापे यांना भ्रमणध्वनी वरून विचारले असता त्यांनी सांगितले सदर ट्रॅक्टर मालकाकडे रेतीचा वाहतूक परवाना नाही. ट्रॅक्टरमधे अवैध रेती असल्याचे कबूल केले असुन यांचा बसणारा दंड संबंधित विभागाला भरून देण्याचे दोन्ही गाडी मालकाने मान्य केले असल्याचे सांगितले.

(the gdv, the gadvishva, dhanora, gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here