– स्व. चुनिलाल पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ चा पुढाकार
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ जानेवारी : येथील ग्रामीण रुग्णालयात १७ जानेवारी रोजी स्व. चुनिलाल पटेल चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळ द्वारा डॉ. अनिल पटेल (M.S. ent) यांनी ५१ रुगांची मोफत कान, नाक, घसा ची तपासणी केली व औषधोपचार करण्यात आले. तसेच पुढील तपासणी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे १७ एप्रिल २०२३ ला ठेवण्यात आलेली आहे .
त्यांच्या या सेवाव्रती कार्याची दखल घेऊन ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र सावसाकडे, डॉ अजित माशेरे, डॉ सिमा गेडाम, अधीपरिचारिका अर्चना कलनाके, अर्शिया सैयद, गणेश कुलमेथे, गौतम राऊत व ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन गौतम राऊत यांनी केले व आभार डॉ. सिमा गेडाम यांनी मानले.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card)