– कुमारी यामिनी राजेंद्र सोनुले प्रथम
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ मे : नुकताच २५ मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला. यात जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथील शाळेचा निकाल ९६. ६६ टक्के लागला असून यामध्ये तालुक्यामधून जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कुमारी यामिनी राजेंद्र सोनुले हिने ७२.८३ टक्के घेऊन पटकविला आहे. तर द्वितीय क्रमांक कुमारी एलिझा अलेक्झांडर टोफो हिने ६५ टक्के, तृतीय क्रमांक कुमारी कल्याणी पंढरी मेश्राम हिने ६२.५०. टक्के गुण प्राप्त केले आहे. महाविद्यालयात एकूण चार विद्यार्थि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य व्ही एम.सुरजुसे, गट शिक्षणाधिकारी व्ही आर आरवेली, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर खोबरे, डी टी कोहाडे, डॉ. रश्मी डोके,प्रशांत साळवे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच कुमारी यामिनी राजेंद्र सोनुले हिने व इतर विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक डॉ. रश्मी डोके, प्राध्यापक ओम देशमुख, प्राध्यापक प्रमोद सहारे, किरण दरडे मॅडम, हारिश पठाण व आपल्या आई वडिलांना यशाचे श्रेय दिली आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, 12 result 2023)