– पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : ब्रम्हपूरी मार्गे वडसा देसाईगंज येत असलेल्या चारचाकी वाहनाला दोघांनी लिफ्ट मागीतली. चारचाकी वाहनधारकाने दोघांना लिफ्ट देत वाहनात बसविले मात्र याचा फायदा घेत त्या दोघांनी वाहनधारकाच्या वाहनातुन चोरी केल्याचा प्रकार ६ सप्टेंबर रोजी घडला. या प्रकरणी वाहनधारकाने देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज येथील मेश्राम दाम्पत्य ब्रम्हपुरी येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान ब्रम्हपुरी येथून देसाईगंज येथे येत असतांना चिचोली येथील अण्णा बार समोर आरोपी असलेले मयक रविंद्र सेदरे (वय २४ ) व त्याचा साथीदार विधीसधर्षित बालक (वय १६ ) दोघेही रा. आबेडकर वार्ड देसाईगंज यांनी मेश्राम दाम्पत्याच्या चारचाकी वाहनाला हात दाखवून थांबविले व लिफ्ट मागीतली. मेश्राम दाम्पत्याने दोघाना लिफ्ट देत कार च्या मागील सिटबर बसविले. मेश्राम दाम्पत्याने सिटच्या मागे बॅग ठेवली होती त्यात असलेले सोन्याच्या अंगठया दोघा आरोपीनी पळविल्याचे घरी पोहचल्यावर बॅग तपासल्यानंतर कळाले. मेश्राम दाम्पत्यानी लगेच देसाईगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तपास हाती घेत अवघ्या १२ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या व गुन्हयात चोरी गेलेला माल ४ नग सोन्याच्या अगठया वजन अंदाजे २४ ग्रॅम किंमत ७२ हजार रूपये असा संपूर्ण मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
यातील आरोपी मंयक रविंद्र सेदरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तर गुन्हयात विधिसंघर्षीत बालकाचे पालक यांना सूचनापत्र देऊन बाल न्यायमंडळापूढे हजर करण्याबाबतची तवजीव ठेवण्यात आली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchirolilocalnews #crimenews #desaiganj )