– आरोपी अटकेत
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. ०७ : तालुक्यातील आमगाव येथून एका संतापजनक घटना ६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. कबूतर चोरीचा संशय असल्याने चिमुकल्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेने देसाईगंज शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आयुष अर्जुन स्वर्णकार असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हा देसाईगंज शहरातील असून त्याचे आमगाव येथे घराचे काम सुरू असल्याचे कळते. दरम्यान आमगाव येथील राम मंदिर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरातील कबूतर त्या घराजवळ खेळत असलेल्या चिमुकल्यांनी चोरी केल्याचा संशय आरोपीस आल्याने त्याने चिमुकल्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपीने मारहाण करतानाची चित्रफितही मोबाईल मध्ये तयार केली. ही घटना ६-७ दिवसांपूर्वीची असून आरोपीने मारहाणीची चित्रफित ५ ऑगस्ट रोजी समाज माध्यमांवर प्रसारित केल्याने हे प्रकरण उघडकीस आले. चित्रफित बघून संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीस अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. सुमारे पाचशे च्या संख्येत संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीचे देसाईगंज शहरातील घर गाठून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण शहरात निर्माण झाले होते. देसाईगंज पोलिसांनी वेळीच दखल घेत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. घटना घडली त्यादरम्यान आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला न्यायाधिश,बाल न्यायालय मंडळ, गडचिरोली यांचे समक्ष हजर केले असता त्यास १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत निरीक्षण गृह येथे ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #desaiganj )