देसाईगंज : कुरुड मधील हत्येचा पर्दाफाश, आरोपीच्या आवळल्या मुसक्या

1740

– ‘या’ कारणाने हत्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथील प्रदिप ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार (वय 30) याची अज्ञाताने ८ ते ९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान हत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी देसाईगंज पोलिसांनी मर्ग दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्धा गुन्हा दाखल केला व सदर गुन्ह्याचा तपास सुरू ठेवला असता या हत्येचा पर्दाफाश करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकास जनार्दन बोरकर (वय ५०) , धंदा-मजुरी रा. कुरुड तह. देसाईगंज, जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व मृतक एकाच गावातील असून दोघांमध्ये नेहमी विविध कारणाने भांडण होत होते. ८ ते ९ फेब्रुवारी दरम्यान दोघांमध्ये भांडण झाले आणि आरोपी विकास ने प्रदीपच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. दरम्यान उपचाराअंती प्रदीपचा मृत्यू झाला. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीय आणून आरोपीस अटक करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांनी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचे नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले. त्याप्रमाणे तपास पथकाने कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलीस उपनिरीक्षक धनगर, पोअं/ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम नामे विकास जनार्दन बोरकर याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्रामध्ये ६ मार्च रोजी सायंकाळी ०५:०९ वा. अटक करण्यात आली.
सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट देसाईगंज यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस ०७ ते ११ मार्च २०२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहेत.

या’ कारणाने हत्या

मृतक हा आरोपीची पत्नी व मुलगी यांचेकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा व त्यांचे घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रो १०:०० ते १०:३० वा. चे दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर, पोना राऊत, पोअं ढोके, पोअं कुमोटी, पोअं सराटे व पोअं शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे.

(#thegdv #thegadvishva #sscexam #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj #kurud )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here