दौरा प्रतिष्ठीतांचा : काय ते रस्ते, काय तो फौजफाटा, काय ते नियोजन एकदम ओके आहे…

1922

The गडविश्व
गडचिरोली, ४ जुलै : जिल्हा मुख्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ तसेच कोनशीला समारंभाकरीता देशाच्या राष्ट्रपतीसह, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री उद्या ५ जुलै रोजी गडचिरोली येथे येत आहेत. दरम्यान या प्रतिष्ठीतांच्या दौऱ्यापूर्वी शहरातील मुख्य रस्ते नवे कोरे झाले आहे तर याकरिता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून मोठा फौजफाटा ठेवण्यात आला व नियोजन पूर्ण ओक झाले आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ तसेच कोनशीला समारंभा करिता महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ह्या गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती असून गडचिरोली जिल्ह्यात देशाचे राष्ट्रपती येणे ही पहिलीच वेळ आहे. असे असतांना जिल्हा मुख्यालयातील आरमोरी मार्गावरील रस्ता शेवटची घटका मोजत असतांना मात्र प्रतिष्ठीतांच्या दौऱ्याने त्याला जगविण्याचा प्रयत्न करून नव्याने डांबर टाकून रस्ता नवा कोरा तयार केलेला आहे. कधीही न दिसणारी स्वच्छता व वाहतूक व्यवस्था एकदम टॉपटीप दिसून येत आहे तर शहरवासीयांकडून प्रतिष्ठीतांच्या दौऱ्याबाबत आनंद व्यक्त करून वर्षातून असे दौरे जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील इतरही भागात होऊन असाच बदल होण्याची आशा व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान गोंडवाना विद्यापीठाच्या समारंभाप्रसंगी महामहीम राष्ट्रपती, महामहीम राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच राज्यातील इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. ©©©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here