डी.एल. एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला २५ जूनपर्यंत मुदतवाढ

168

The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे सदर अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इत्यादी बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनराज चापले यांनी कळविले आहे.

(#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolilocalnews #muktipath #Bangladesh vs Australia #Spain vs Italy #Virat Kohli #Jasprit Bumrah #Rishabh Pant #Donald Sutherland #CEOAyushisingh #zpgadchiroli #People with disabilities should reach out to avail government schemes: CEO Ayushi Singh)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here