चारित्र्यावर संशय घेऊन ठार मारणाऱ्यास जन्मठेप

651

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, १५ डिसेंबर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस धारधार शस्त्राने वार करून जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपी पतीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संदीप तुलशीराम गावडे (३४) रा. आमगाव चक नं. १ ता.चामोर्शी असे आरोपी पतीचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, आरोपी संदीप व त्याची पत्नी हे मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यात गेले होते. त्यावेळी पत्नीचे दुसऱ्या सोबत अनैतिक संबंध असल्याचे संशय घेऊन भांडण केले त्यानंतर स्वगावी आले असता तेव्हासुद्धा पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचे राग धरून २५ ते २६ फेब्रुवारी च्या रात्रोच्या दरम्यान पत्नी झोपून असतांना संधी साधून कुऱ्हाडी सारख्या धारधार शस्त्राने डाव्या कानाच्या खाली वार करून ठार केले. याप्रकरणी मृतकाच्या बहिणीने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे तक्रार दिली असता गुन्हा नोंद केला. पोलीस यंत्रणेने तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयान तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून १५ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी संदीप तुलशिराम गावडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी कलम ३०२ भादवीमध्ये जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे सहा.जिल्हा सरकारी वकील एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्ह्याचा तपास पोनी प्रकाश तुनकलवार व मपोउपनि निशा खोब्रागडे पोलीस स्टेशन चामोर्शी यांनी केला. सदर प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भूमिका पार पाडली.

(The गडविश्व) (Gadchiroli News Updates) (Croatia vs Morocco) (IRCTC Share Price)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here