निवेदनातुन कार्यकारी अभियंता गडचिरोली यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २४ : तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निमगाव येथिल बाह्य रस्त्ये अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून गावातुन बाहेर निघायला एकही रस्ता चांगल्या प्रतीचा नसल्याने गावातील लोकांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याने या बाह्य रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी निमगाव येथिल गावकऱ्यांनी कार्यकारी अभियंता गडचिरोली यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना २३ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
निमनवाडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निमगाव गावाला जाण्यासाठी सध्या तिन मार्ग अस्तित्वात आहेत. रांगी ते निमगाव हा मार्ग असुन सदर रस्ता अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेला. निमगाव ते बोरी मार्ग हा सुद्धा रस्ता पाण्याच्या धारेने वाहून गेल्याने भला मोठा भगदाड पडला त्यामुळे वाहतूक बंद पडली आहे. निमगाव ते मोहटोला मार्गावर गावात प्रवेश करतानाच मोठे मोठे खड्डे पडले आहेत. गावात चारचाकी वाहने नेणे कठीण आहे. गावात येणाऱ्या सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून सध्या निमनवाडा ग्रामपंचायत मधे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला गावांची अवस्था रस्त्याच्या बाबतीत वाईट आहे. येथील गावकऱ्यांना दैनिक कामासाठी शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना याच मार्गाने येथुन रांगीला दररोज येजा करावे लागते. रस्त्याच्या दुरा अवस्थेमुळे गाव कव्हरेसेत्रा बाहेर आहे. निमगाव मासरगाटा येथील नागरिकांना दररोज कार्यालयीन, बँक, व्यापारी, आठवडी बाजार व खाजगी कामाकरीता लोक दररोज जिव मुठीत घेऊन प्रवास करतात. गावात सध्या कोणतेच वाहन जावू शकत नाही. रस्त्याच्या दुरावस्था मुळे गाव संपर्क क्षेत्राबाहेर आहे. गावात प्रवेश करण्याचे तिनही मार्ग बंद पडलेले आहेत. इमर्जन्सी रुग्णाला दवाखान्यात न्यायची पाळी आली तर कसे न्यायचे.रुग्णाला वाटेतच दम तोडावे लागेल म्हणुन शासनाने वेळीच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी निमनवाडा येथिल उपसरपंच चेतन बी.सुरपाम तथा धानोरा सरपंच संघटना सचिव ग्राम. रोजगार सेवक यदूनंदन चापले, हिराजी कुकडकार, राहुल मेश्राम यासह निमगाव वासियांनी केली आहे.
