मुनघाटे महाविद्यालयात संविधान दिन साजरा

124

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २९ : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जी. सी .पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जन शिक्षण संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला व बिरसा मुंडा जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्यांचा गौरव करून त्यांना अभिवादन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आले . भारतीय संविधान म्हणजे मनुष्याचा उत्कर्ष स्वातंत्र्य व समता बंधुता न्याय यांचे शाश्वत हमी देणारे दस्तऐवज होय. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आठल्ये जन शिक्षणसंस्था गोवा, श्रीमती आठल्ये, गोवा, प्रा.ज्ञानेश बनसोड, पायघन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन धानोरा, अलोने संचालक जनशिक्षण संस्था गडचिरोली, विचार मंचावर उपस्थित होते.
भारतीय संविधानात समता, न्याय, बंधुता या तत्त्वाचा अंतर्भाव करून विषमता नष्ट केली. भारतीय संविधानात जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे व सर्वात मोठी लोकशाही टिकवून ते यशस्वी करण्याचे संपूर्ण श्रेय भारतीय संविधानत आहे. असे आपल्या भाषणातून आठवले यांनी मत मांडले. भारतीय तसेच बिरसा मुंडा यांनी आदिवासी समुदायाला जागृत करण्याकरता व ब्रिटिशांच्या अन्याय नष्ट करण्याकरिता क्रांती केली. याकरिता त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढा दिला लोकांना संघटित केले त्यांचे प्रबोधन केले व आदिवासी समाजाचा उद्धार झाला पाहिजे याकरता ते सतत झटले. आदिवासी संस्कृती चे जतन व संवर्धन झाले पाहिजे याकरिता लढा दिला असे मत बिरसा मुंडा गौरव दिन आठल्ये संचालक जन शिक्षण संस्था गोवा यांनी व्यक्त केले. भारतीय संविधान मानवी कल्याणाचे महत्त्वपूर्ण साधन आहे तसेच कोणतीही क्रांती न करता शांततेच्या मार्गाने सत्ता परिवर्तन करणे व कायमस्वरूपी शांतता सुव्यवस्था राखणे भारतीय संविधानाद्वारे साध्य होते.
या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती म्हातारे तर आभार चव्हाण यांनी मानले. भारतीय संविधान दिनी भूषण भैसारे समाजसेवक धानोरा, भास्कर कायते, प्रा करमनकर व जन शिक्षण संस्था चे सर्व प्रशिक्षक तसेच स्थानिक नागरिक महिला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here