इयत्ता १० वीचा निकाल उद्या जाहीर होणार : विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लिंकची यादी प्रसिद्ध
The गडविश्व
पुणे, दि. १२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी (SSC) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल उद्या, १३ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत मंडळाने अधिकृत परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
राज्यभरातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतलेल्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांसह खालील विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

1. https://results.digilocker.gov.in
2. https://sscresult.mahahsscboard.in
4. https://results.targetpublications.org
5. https://results.navneet.com
6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
8. https://www.indiatoday.in/education-today/results
9. https://www.aajtak.in/education/board-exam-results
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर व आईचे नाव यांची माहिती आवश्यक राहील. तसेच, शाळांसाठी https://mahahsscboard.in (in school login) या पोर्टलवर एकत्रित निकाल व संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.