चिमूर : मुक्ताई धबधबा परिसरात वाघाची दहशत, काही दिवस धबधबा राहणार बंद

1436

– वनविभागाच्या वाघावर नजर
The गडविश्व
ता.प्र / चिमूर, १७ जुलै : तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या मुक्ताई धबधबा परिसरात वाघाची दहशत असल्याने काही दिवस बंद असणार आहे असे कळविण्यात आले आहे.
मुक्ताई धबधबा परिसरातील शेतशिवारातून एका शेतकऱ्याला वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. सदर घटनेने वनविभाग सतर्क होत मुक्ताई धबधबा पर्यटकांसाठी काही दिवस बंद केले आहे. नुकताच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मुक्ताई धबधबा कोसळू लागल्यानंतर पर्यटकांची येथे येण्याची लगबग लागली होती. दरवर्षी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटकांची तुफान गर्दी असते. तर आता पावसाने हजेरी लावल्याने धबधबा वाहत आहे त्यामुळे पर्यटक याकडे वळत आहे मात्र पर्यटकांच्या या आनंदावर वाघाची दहशत पहावयास मिळत आहे. तीन दिवसांपूर्वी परिसरात वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याने दहशत पसरली असून पर्यटकांच्या व शेतकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता वनविभागाने सदर धबधबा काही दिवस बंद करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच परिसरात वनविभागाने आठ कॅमेरे लावून वाघावर करडी नजर ठेवली जात असल्याची माहिती आहे. धबधबा जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
(the gdv, the gadvishva, chandrpur, chimur, muktai waterfall)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here