– भेसळीबाबत तक्रार/माहिती देणाऱ्या व्यक्तिची माहिती पुर्णपणे राहणार गोपनिय
The गडविश्व
गडचिरोली, ३१ ऑगस्ट : गडचिरोली जिल्हयातील भेसळ रोखण्यासाठी तसेच ग्राहकांच्या सुरक्षीततेची खात्री करण्यासाठी दूध भेसळ रोखणेसाठी तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी दूधात भेसळ करण्या-यांविरुध्द कठोर कारवाई तसेच अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोगयाचे रक्षण करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाअधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी, गडचिरोली- अध्यक्ष, अप्पर पोलिस अधिक्षक, गडचिरोली – सदस्य, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली- सदस्य, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, गडचिरोली- सदस्य, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, गडचिरोली- सदस्य, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली- सदस्य सचिव असतील.
गडचिरोली जिल्हयातील दुध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करणेसाठी समितीची पहिली बैठक ३० ऑगस्ट २०२३ रोजी आयोजीत करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये अध्यक्षांनी दिलेल्या सुचनेनुसार अन्न व सुरक्षा आणि ग्राहक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणातील अग्रगन्य प्राधिकरण दूध भेसळच्या वाढत्या प्रकरणासाठी अत्यंत चिंतित आहे.
दूध आपल्या दैनंदीन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्त्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. तथापी हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. काही समाजकंटक व्यक्ती दूध भेसळ करण्यासाठी आणि नफा वाढविण्यासाठी त्यांची गुणवंत्ता आणि सुरक्षेशी तडजोड करुन विविध फसव्या पदधतीच्या वापर करत आहेत. दुग्ध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, दुधभुक्टी, वनस्पती, तेल, स्टार्च, युरीया, डीटर्जन्ट आणि ईतर रसायनाचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पोष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत तर मानवी शारीरिक समस्या पचन, एलर्जी आणि दिर्घकालीन अवयवाचे नुकसान करतात या सारख्या गंभीर आरोग्य समस्या देखिल होउ शकतात या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उदयोगाचे भाग धारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उपरोक्त गठीत समिती मार्फत गडचिरोली जिल्हयातील दुध संकलन स्विकृती केंन्द्र, गडचिरोली जिल्हातील/ जिल्हाबाहेरील तसेच परराज्यातुन येणाऱ्या दूधाचे नमुने तसेच सरकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रीया केंद्रावरील (डेयरी) नमुने यांची तपासणी साठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन विभाग, गडचिरोली विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्ष्टि ठरवुन देण्यात आले आहे. दूग्ध व दूग्धज॑न्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाया व्यक्ती/डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवुन भेसळीबाबत आढळुन आलेल्या कसुरदारावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल. यामुळे दूध भेसळीबाबत समाजामध्ये जाग्रुकता निर्माण होवुन दूध भेसळ रोखण्यासाठी उपरोक्त समितीमार्फत आवाहन करण्यात येत असुन दुध भेसळी बाबत माहिती देण्यासाठी 07132-295070,07132-222311 या दुरध्वनी नंबरवर किंवा इमेल आयडी fdagadchiroli@gmail.com प्रसारीत करण्यात येत आहेत. दुध भेसळीबाबत तक्रार/माहिती देणाऱ्या व्यक्तिची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल. असे अध्यक्ष, दुधभेसळ प्रतिबंधात्मक समिती तथा अप्पर जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.