बसचे छत उघडे प्रकरण : विभागीय यंत्र अभियंता निलंबित

1402

– मोठया प्रमाणात व्हिडीओ व्हायरल
The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : जिल्हयातील अहेरी आगाराची बस रस्त्यावर धावत होती दरम्यान त्या बसचे वाहकाकडील बाजूचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे व्हिडीओ मोठया प्रमाणात समाजमाध्यमांवर व्हायरल झाले तसेच याबाबतचे वृत्त वृतवाहीन्यांवर आले. आता या प्रकरणी विभागीय यंत्र अभियंता शि.रा.बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हयाच्या अहेरी आगराची एमएच ४० वाय ५४९४ क्रमांकाची बस गडचिरोली मुलचेरा मार्गे अहेरी मार्गावर धावत असतांना वाहकाच्या बाजुकडील बसचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले तसेच वृत्तवाहिण्यांवर सुध्दा याबाबत दाखविण्यात आले. यासंदर्भात सदर बसचे दुरूस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबधित विभागाचे विभागीय यंत्र अभियंता शि .रा.बिराजदार यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पुर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव बिजाजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पुर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
तसेच यापुढे वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रृटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सुचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देवून बसेस मार्गस्थ करव्यात असे देखिल निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli new, ST bus gadchiroli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here