देसाईगंज : कोरेगांव ग्रामपंचायतीवर भाजप चे वर्चस्व

329

– सरपंच पदी कुंदा ऋषी गायकवाड विजयी
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, २० डिसेंबर : तालुक्यातील कोरेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज २० डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजप प्रणित गटाच्या सरपंच पदासह ७ उमेदवारांनी निवडणूक जिंकून निर्विवाद सत्ता हस्तगत केली.
कोरेगाव येथील निवडनुक प्रक्रिया १८ डिसेंबर ला पार पडली. आज २० डिसेंबर ला मतमोजणी प्रक्रिया तहसिल कार्यालय देसाईगंज येथील सभागृहात मंडळ अधिकारी तथा महसुल निरिक्षक खुशाल कावळे यांनी पार पाडली. या निवडणुकीत भाजप प्रणित गटाने दणदणीत विजय संपादन केला. सरपंच पदाच्या उमेदवार कुंदा ऋषी गायकवाड यांनी १२९० मते घेवुन प्रतिस्पर्धी उमेदवार यांना पराभुत केले. त्यांना ९४० मते मिळाली. प्रभाग क्रमांक १ मधुन राजेश राऊत ४४० मते घेवुन विजयी झाले पराभुत उमेदवार अनिल मस्के यांना ३४३ मते मिळाली . प्रभाग क्रमांक २ मधुन चांदणी रामटेके ३१९ मते घेवुन विजयी झाल्या तर पराभुत उमेदवार उषा सहारे यांना २५६ मते मिळाली, प्रभाग ३ मधुन दिपा वाघाडे ५१० मते घेवुन विजयी झाल्या तर पराभुत उमेदवार सिमा आळे यांना २३९ मते मिळाली, प्रभाग ४ मधुन अशोक राऊत ४३७ मते घेवुन विजयी झाले तर पराभुत उमेदवार खुशाल आळे यांना १६७ मते मिळाली, प्रभाग ६ मधुन मालन पुस्तोडे ३७९ मते घेवुन विजयी झाल्या तर पराभुत क्रिष्णाबाई कापगते यांना ३५२ मते मिळाली, प्रभाग ७ मधुन धनंजय तिरपुडे २७९ मते घेवुन विजयी झाले पराभुत देवानंद सहारे यांना २०३ मते मिळाली, प्रभाग ८ मधुन डाकराम राऊत ४४४ मते घेवुन विजय मिळविला तर पराभुत उमेदवार २६० मते मिळाली, प्रभाग क्रमांक ९ मधुन शिवसेना प्रणित आघाडिचे प्रशांत किलनाके १९३ मते घेवुन विजयी झाले, पराभुत हरिविजय तुमराम यांना १४१ मते मिळाली, प्रभाग १० च्या उमेदवार महानंदा राऊत २०५ मते घेवुन विजयी झाल्या तर पराभुत उमेदवार मनिषा मदन लाडे यांना १४४ मते मिळाली, भाजप प्रणित सरपंच पदाच्या उमेदवार कुंदा ऋषीजी गायकवाड यांचेसह ७ सदस्यांनी विजय संपादन करुन भाजप प्रणित गटाची निर्विवाद बहुमताची सत्ता हस्तगत केली. काँग्रेस गटाच्या ईंदु जयंत मरस्कोल्हे ह्या बिनविरोध निवडुण आल्या यासह राजेश राऊत अशी दोन सदस्य निवडुन आली शिवसेनेचे प्रशांत किलनाके व एक सदस्य अपक्ष निवडुन आले.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (Elin Electronics IPO GMP) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Argentina vs France) (Muktipath) (Gram panchayat election 2022 Maharashtra Result) (BJP dominates Koregaon Gram Panchayat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here