तलाठी परीक्षेबाबत मोठी अपडेट : उमेदवारांना पाहता येणार आपली उत्तरतालीका

1168

– प्रश्नाबाबत आक्षेपही नोंदवता येणार
The गडविश्व
गडचिरोली, २७ सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट क) संवर्गाचे सरळसेवा पदभरतीच्या परिक्षेबाबत मोठी अपडेट आली असून उमेदवारांना आता उद्या २८ सप्टेंबर पासून आपल्या लॉगीन आयडीवर उत्तरतालीका पाहता येणार आहे. तसेच प्रश्नाबाबत आक्षेपही नोंदवता येणार आहे.
तलाठी पदभरती करिता १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकुण १९ दिवसामध्ये एकुण ५७ सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आलेली. उद्या २८ सप्टेंबर पासून उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांच्या परीक्षेच्या सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देणेत येणार आहे. उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११.५५ या कालावधीत TCS कंपनीकडून लिंक खुली करून देण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकती बाबत TCS चे समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदर प्रश्नाबाबत गुण देण्याबाबत धोरण निश्चित करुन देण्यात येणार आहे. TCS कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करण्यासाठी प्रति आक्षेप / हरकती करिता रक्कम रु. १००/- इतकी फी आकारण्यात येणार आहे. तर आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येईल व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही.
तलाठी भरतीची परीक्षा एकुण ५७ सत्रामध्ये घेणेत आलेली आहे. सदर ५७ सत्राची काठिण्य पातळीचे समीकरण (Normalization) करण्यात येणार आहे. TCS कंपनीकडून करण्यात येणाऱ्या Normalization सुत्राची माहिती यापुर्वीच प्रसिध्द करण्यात आलेली आहे. Normalization अंती उमेदवारांचे गुण निश्चित करुन राज्याची मेरिट लिस्ट प्रसिध्द करण्यात येणार आहे असे आनंद रायते, भा.प्र.से राज्य परिक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांनी कळविले आहे.

(the gdv, the gadvishva, garchiroli news, talathi recrutment 2023, answer key)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here