– राज्यातील महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी
The गडविश्व
गडचिरोली, दि.१९ : राज्यातील महायुतीच्या सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपयांची भेट दिली. महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे. परंतु महाविकास आघाडीची लाडक्या बहिणींचे १५०० रूपये बंद करण्यासाठी धडपड सूरू आहे. त्यामूळे येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींनी आपल्या देवेंद्र फडणविस (देवाभाऊंच्या) पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथे आयोजीत लाडक्या बहिणींच्या मेळाव्या प्रसंगी केले.
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींचा मेळावा भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शीच्या वतीने चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला. या मेळावाला तालुक्यातील लाडक्या बहिणीने मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती दर्शविली.
