बंदोबस्तावर असतांना बीअर ढोसणे पोलिसांना पडले महागात : दोघेजण निलंबित

1207

– पोलीस विभागात खळबळ
The गडविश्व
चंद्रपूर, १७ जून : पोलिस बंदोबस्तादरम्यान बीअर शॉपीमध्ये जाऊन दारू ढोसणे पोलिसांना महाग पडले आहे. दरम्यान दोन पोलिसांना चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित झालेल्या पोलिसांची नावे आहेत.
ब्रह्मपुरी येथे २ जून रोजी जिल्हा निर्मितीसाठी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी ब्रह्मपुरी उपविभागातील पोलिसांच्या चमूची ड्युटी लावण्यात आली होती. त्यात तळोधी पोलिस स्टेशनमधील पोलिसांचाही समावेश होता. यात उमेश मस्के, नरेश निमगडे यांच्यासह अन्य एक कर्मचारीसुद्धा कर्तव्यावर होते. दरम्यान, आंदोलन सुरूच असताना मस्के, निमगडे व अन्य एक कर्मचारी असे तिघेजण कर्तव्यावर असतानाच ब्रह्मपुरी येथील एका बीअर दुकानात गेले व बीअर ढोसली. याबाबतच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांना माहिती मिळताच दुकान गाठले आता ते तिघेही वर्दीवरच बीअर बारमध्ये दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविली असता जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या संपूर्ण बाबींची चौकशी केल्यानंतर दोघांनाही निलंबित केले आहे. त्यातील एकजण मद्य पित नसल्याने त्याच्यावर कारवाई केली नसल्याची माहिती आहे. या कारवाईवरून कर्तव्यावर असताना दारू ढोसणाऱ्या पोलिसांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
(the gdv, the gadvishva, chandrpur, bramhapuri, talodhi)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here