The गडविश्व
गडचिरोली दि. १२ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर सातत्याने सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे व निर्माणाधिन महामार्गाचे कामामुळे पावसाळ्यात सदर मार्गावर मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतूकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय भाकरे यांनी निर्गमित केले आहे.
यानुसार सदर महामार्गावर १९ जुन च्या मध्यरात्रीपासून ते ३१ आक्टोबर २०२४ पर्यत जड वाहतुकीस मनाई करण्यात आली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
असा असेल पर्यायी मार्ग
सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर येणाऱ्या वाहनांकरिता
सिरोंचा – मंचेरियाल – राजुरा – बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.
आलापल्लीहून मंचेरियाल मार्गे जाणाऱ्या मार्गासाठी
आलापल्ली-आष्टी- बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.
आदेशाचे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतुकदारावर भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
आपातकालीन सेवा, प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न-औषध-पुरवठा, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती व आरोग्य विभाग संदर्भातील वाहनांना सदर आदेश लागू राहणार नाही.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )