आरमोरी : अखेर ‘त्या’ अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटली

401

– मृत्युचे कारण गुलदस्त्यात
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २४ ऑक्टोबर : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर ब्रह्मपुरी रोड नजीक असलेल्या जीवानी राईस मिलच्या मागे एका अनोळखी इसमाचा मृतदेह २२ ऑक्टोंबर रोजी आढळला होता. सदर इसमाची ओळख पटविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे ठेवून पोलीस स्टेशन आरमोरी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी केले होते. सदर इसमाची ओळख पटली असून विलास नामदेव मेस्राम
(अंदाजे वय ४५) रा..रणमोचण ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपुर असे नाव आहे.
सदर मृतक व्यक्ती डेकोरेशनच्या कामावर जात असल्याचे सांगितले जाते. विलास हा १९ ऑक्टोबर रोजी कामाला जात आहे असे सांगून गेला होता व तो आरमोरी येथील नातेवाईक यांच्याकडे आला असल्याचे कळले. दरम्यान २२ ऑक्टोबर रोजी तो जीवानी राईस मिल च्या मागे मृतावस्थेत आढळून आला. काही वेळ ओळख पटली नव्हती मात्र याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी ओळख पटवून शवविच्छेदन करण्यात आले व आज ४.०० वा. मृतदेह सुपुर्द करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here