क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराकरीता अर्ज आमंत्रित

270

The गडविश्व
गडचिरोली,दि. २७ : शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होता. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी आवेदने सादर करु इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांनी https://froms.gle/7yYfYG5YGxVFAju7 या लिंकवर आपली आवेदने २५ जुन २०२४ ते ०५ जुलै २०२४ पर्यंत सादर करावीत.

आवेदन सादर करण्याचे वेळापत्रक

२५ जुन ते ०५ जुलै २०२४ ऑनलाईन नोंदणी करणे. ०६ ते ०७ जुलै २०२४ संचालनालय स्तरावरील काम. ०८ ते १५ जुलै २०२४ जिल्हास्तरावरुन प्रत्यक्ष शाळा भेट. १६ ते २१ जुलै २०२४ जिल्हास्तरावरील मुलाखत/ पडताळणी करुन शिफारशी संचालनालयाकडे सादर करणे. २२ ते २९ जुलै २०२४ राज्यस्तरावरील मुलाखत/ पडताळणी.३० जुलै ते ०८ ऑगस्ट २०२४ राज्य शिक्षक पुरस्कार संबधित संचालनालय स्तरावरील काम पूर्ण करणे. ११ ते १४ ऑगस्ट २०२४ राज्य निवड समिती सदस्यांची अंतिम बैठक आयोजित करणे. १६ ऑगस्ट २०२४ रोजी निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती शासनास सादर करणे. असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक), तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय निवड समिती यांनी कळविले आहे.

(thegdv thegadvishva gadchirolinews gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here